आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शेखर सिंग यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.सिंग हे २०१२ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. ते मूळचे दिल्लीचे रहिवासी असून सिव्हिल इंजिनिअरींग (स्ट्रक्चरल) मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आहे.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:36 IST