शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

नेटवर्कअभावी बँक व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:14 IST

सिरोंचा तालुक्यातील इंटरनेट सेवा सोमवारी ठप्प असल्याने बँक व्यवहार पूर्णपणे बंद होते. याचा फटका शासकीय कार्यालयांनाही बसला. अधूनमधून इंटरनेट सेवा बंद पडत राहत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

ठळक मुद्दे बँक व कार्यालयांना फटका : सिरोंचातील सेवा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील इंटरनेट सेवा सोमवारी ठप्प असल्याने बँक व्यवहार पूर्णपणे बंद होते. याचा फटका शासकीय कार्यालयांनाही बसला. अधूनमधून इंटरनेट सेवा बंद पडत राहत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.सोमवारी सिरोंचा येथील आठवडी बाजार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी बँकांमधून पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सकाळपासूनच इंटरनेट बंद असल्याने नेटवर्क नाही, लिंक फेल असे बोर्ड बँकांच्या प्रशासनाने दरवाजासमोर लावले होते. काही वेळाने इंटरनेट सेवा सुरू होईल, या अपेक्षेणे नागरिक बँकेसमोर बसले होते. मात्र सायंकाळपर्यंत इंटरनेट सेवा सुरू झाली नाही. परिणामी दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. पैसे नसल्याने बाजार करण्याचीही अडचण झाली.सिरोंचा तालुकास्थळ असूनही वेळोवेळी दूरसंचार सेवा ठप्प पडते. याबाबतचे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी गंभीरतेने घेत नाही. सिरोंचासह संपूर्ण तालुकाच नेटवर्कच्या समस्येने ग्रस्त झाला आहे. जागोजागी टॉवर लावण्यात आले आहेत. या टॉवरवर थ्री-जी यंत्रणा बसविल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र साधा फोनही लागत नाही. त्यामुळे थ्री-जी यंत्रणा गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेळावेळी इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.