शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दुर्दम्य इच्छाशक्तीने यश शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:27 IST

आजचे विद्यार्थी उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत. प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात. ध्येय निश्चित करून सातत्त्यपूर्ण परिश्रम व मेहनत घेतल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करता येत नाही.

ठळक मुद्देसागर कवडे यांचे आवाहन : लोकमतच्या ‘स्पर्धेच्या जगात’ सदराची केली प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आजचे विद्यार्थी उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत. प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात. ध्येय निश्चित करून सातत्त्यपूर्ण परिश्रम व मेहनत घेतल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करता येत नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वासानेच स्पर्धा परीक्षेत यश शक्य आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकमत समूह व झेप करिअर अ‍ॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धेच्या जगात’ या सदराचे मान्यवरांच्या हस्ते वाचकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. शशिकांत गेडाम, पोलीस उपनिरीक्षक शीतल राणे, लोकमतचे आरमोरी येथील प्रतिनिधी विलास चिलबुले, महेंद्र रामटेके, वैरागड येथील वार्ताहर प्रदीप बोडणे, झेप करिअर अ‍ॅकॅडमीच्या नताशा मेश्राम आदी उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी लोकमत समुहाने स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासंदर्भात सुरू केलेल्या सदराचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे सदर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सदराचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे उपयोगी सूत्र स्पष्ट केले. पोलीस उपनिरीक्षक शीतल राणे यांनी मार्गदर्शन करतांना परिस्थितीचा बाहू न करता परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची मानसिकता जोपासून परिश्रम करावे, असे आवाहन केले. झेप करिअर अ‍ॅकॅडमीतर्फे ९० गुणांची विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या परीक्षेला ४०० वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.प्रास्ताविक प्रदीप बोडणे, संचालन प्रा. डॉ. विजय गोरडे यांनी केले तर आभार शशिकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र घोनमोडे, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, प्रा. डॉ. उत्तमचंद कांबळे, प्रा. डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रा. छगन मुगमोडे, प्रा. प्रियदर्शन गणवीर, प्रा. डॉ. विजय रेवतकर, प्रा. स्नेहा मोहुर्ले, प्रा. गजानन बोरकर, प्रा. गजेंद्र कढव, सुशील वाटेकर, राकेश पारधी यांनी सहकार्य केले.