शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यात युवकांनी पुढे येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:40 IST

जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने जीवनाचे सार्थक करायचे असेल तर सामाजिक कार्यात भाग घेणे महत्त्वाचे आहे.

अनिकेत आमटे यांचे प्रतिपादन : आरमोरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; रोवणी करणाऱ्या महिलांना मार्गदर्शनलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने जीवनाचे सार्थक करायचे असेल तर सामाजिक कार्यात भाग घेणे महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस सामाजिक क्षेत्रामध्ये पशुप्रेमी व निसर्गप्रेमीची संख्या वाढली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी बहूल भागात सामाजिक कार्य करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अनिकेत प्रकाश आमटे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथील बँक शाखेच्या सभागृहात सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह तथा रोवणीची कामे करणाऱ्या महिला व त्यांच्या समस्यांचे निराकरण या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी समाजकार्य विकास संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते. मार्गदर्शक म्हणून समिक्षा आमटे, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर भातकुलकर, मयूर पिलेवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, रितेश पाल आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अनिकेत आमटे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपताना समाजातील सर्व सामान्य लोकांसोबत त्यांच्याच पध्दतीने वागणे गरजेचे ठरते. आदिवासी क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र त्यावर मात करणे गरजेचे असते. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मानलेमहिलांना हातमोजे वितरणयावेळी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रोवणीचे काम करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून प्लास्टिकच्या हाजमोज्यांचे वितरण करण्यात आले.