शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लहान कुटुंबांबाबत जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 01:23 IST

जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़

जागतिक लोकसंख्या दिन : वाढत्या लोकसंख्येचा संसाधनांवर परिणामगडचिरोली : जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ त्यामुळे २०११ च्या जनगणनेत तब्बल १० लाख ७२ हजार ९०४ लोकसंख्येचा हा जिल्हा विकासाच्या क्षेत्रात अद्यापही पिछाडीवरच आहे़ लहान कुटुंबाबत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ९ लाख ७० हजार २९४ होती़ यात ४ लाख ९१ हजार १०१ पुरूष व ४ लाख ७९ हजार १९३ महिलांचा समावेश होता़ जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या आजही ग्रामीण भागातच आहे़ २००१ मध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ३ हजार ३३ होती़ यात ४ लाख ५६ हजार ६४७ पुरूष व ४ लाख ४६ हजार ३८६ महिलांचा समावेश होता़ शहरी भागात ६७ हजार २६१ लोकसंख्या होती़ या शहरी लोकसंख्येत ३४ हजार ४५४ पुरूष व ३२ हजार ८०७ महिला होत्या़ २०११ च्या जनगणनेत ग्रामीण व शहरातील लोकसंख्येत बरीच वाढ झाली़ नव्या जनगणनेनुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ५३ हजार ८५८ आहे़ यात पुरूष ४ लाख ८२ हजार ७४० व महिला ४ लाख ७१ हजार २२७ महिला आहेत़ शहरी भागात वाढीसह १ लाख १८ हजार ९३७ लोकांची नोंद झाली आहे़ यात ६० हजार ७३ पुरूष व ५७ हजार ८६४ महिलांचा समावेश आहे़