भंगारामपेठा, काेयागुड्डा, चिटवेली, चितारेव, मांड्रा, राेमलकसा, माेदुमडगू, कप्पेेवंचा यांच्यासह अनेक गावे या भागात माेडतात. या परिसरात १५ ते २० हजार लाेकसंख्या आहे. सध्याचे युग हे इंटरनेटचे युग असल्याने शासकीय याेजनांची माहिती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध हाेते. शिवाय अर्ज सुद्धा ऑनलाईन भरता येताे. विविध प्रकारचे दाखलेही मिळविता येतात. दुर्गम भाग असल्याने येेथे बाजारपेठ नाही. त्यामुळे सुशिक्षित लाेक ऑनलाईन शाॅपिंग करू शकतात. यूपीआयद्वारे घरी बसून आर्थिक व्यवहार व इतर कामे करतात. मात्र यासाठी इंटरनेट सेवा चांगली असणे गरजेचे आहे. मात्र या भागात या सेवेचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
बाॅक्स .....
दळणवळण
साधनाचा अभाव
दामरंचा परिसरात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने छाेट्या-माेठ्या कामासाठी या भागातील नागरिकांना कमलापूर तसेच अहेरी किंवा आलापल्लीला जावे लागते. मात्र दळणवळणाचे साधन वेळेवर उपलब्ध हाेत नाही. खासगी वाहन उपलब्ध हाेते. मात्र ते अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारतात. शिवाय प्रवाशांची गर्दी राहत असल्याने अनेक प्रवासी वरती लटकून प्रवास करतात.