शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

खरिपासाठी ३० हजार क्विंटल बियाणांची गरज

By admin | Updated: May 16, 2017 00:45 IST

खरीप हंगामाला पुढील १५ दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

हंगाम तोंडावर : धानासाठी सर्वाधिक बियाणे लागणारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामाला पुढील १५ दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २९ हजार ३९६ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.गडचिरोली जिह्यातील हवामान व शेतजमीन धानपिकासाठी पोषक असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक धानपिकाची लागवड करतात. खरीप हंगामात सुमारे २ लाख २३ हजार ९८५ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी एकट्या धानपिकाची लागवड २ हजार ३०० हेक्टरवर होणार आहे. त्यामुळे धानपिकाच्या बियाणांची सर्वाधिक गरज भासते. २०१७-१८ च्या खरीप हंगामात २६ हजार ७४० क्विंटल धानाच्या बियाणांची आवश्यकता भासेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीन पिकाची लागवड ३ हजार ७३० हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी २ हजार १०० क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. तूर पिकाची पेरणी ७ हजार ९४६ हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी ३५० क्विंटल तूर बियाणांची गरज भासणार आहे. जिल्ह्यात कापसाचा व मक्याचा पेरा वाढत चालला आहे. सोयाबीन खालील क्षेत्रावर आता कापसाची लागवड केली जात आहे. यावर्षी १२ हजार हेक्टरवर कापूस तर १ हजार २०० हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. कापसासाठी १६२ क्विंटल तर मक्क्यासाठी १२५ क्विंटल बियाणांची आवश्यकता भासणार आहे. उडीताचे ३ क्विंटल, तिळ ११ क्विंटल बियाणांची गरज पडणार आहे. कृषी विभाग राज्य शासनाच्या कंपन्यांकडून १६ हजार ७३९ तर खासगी कंपन्यांकडून १२ हजार ६५७ क्विंटल बियाणे मागविणार आहे. दरवर्षी ऐन पेरणीच्या वेळेवर बियाणांची टंचाई जाणवते. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जातो. असे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच नियोजन केले आहे. पेरणीपूर्वी पुरेशाप्रमाणात बियाणे उपलब्ध होतील. यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचा घरगुती बियाण्यांवर भरघरचे धान्य बियाणे म्हणून वापरण्यासाठी त्याच्यावर कोणत्या प्रक्रिया करण्यात याव्या, याबाबत कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. बियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडीलच धान्य खरेदी करतात. त्यांच्यावर थोडीफार प्रक्रिया केल्यानंतर तेच बियाणे शेतकऱ्यांना चारपट अधिक किंमतीने विकले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी स्वत:कडचेही बियाणे वापरत आहेत. दरवर्षी केवळ ३३ टक्केच बियाणे खरेदी केले जातात. उर्वरित ७० टक्के बियाणे शेतकरी स्वत:कडचे वापरतात. मागील वर्षीप्रमाणे चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना बियाणांची टंचाई जावणार नाही. मात्र पावसाने दगा दिल्यास बियाणांची मागणी वाढू शकते.