शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणली काेविड सेंटरची माहीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेडच्या कोविड केअर सेंटरला  भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून  कोविडसंदर्भात माहितीवजा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात कोविडचे संक्रमण वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशावन्ये जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरची पाहणी केली जात आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी तीन सेंटरला भेटी, आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे अडचणी मांडणार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी ५ मे रोजी कुरखेडा, देसाईगंज व आरमाेरी या तीनही  ठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील साेयीसुविधा, व्यवस्था व अडीअडचणींची माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधीक्षक व आराेग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून या अडचणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेडच्या कोविड केअर सेंटरला  भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून  कोविडसंदर्भात माहितीवजा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात कोविडचे संक्रमण वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशावन्ये जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरची पाहणी केली जात आहे. याशिवाय शासकीय वसतिगृहात असलेल्या तालुक्यातील दोन कोविड सेंटरच्या ठिकाणी भेट देऊन रवींद्र वासेकर यांनी डाॅक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाेबत  संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून विशेष सहकार्याकरिता राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.    याप्रसंगी राकाँचे जिल्हा सचिव संजय कोचे, युवक सरचिटणीस कुलदीप सोनकुसरे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी, डाॅ. जगदीश बोरकर, पुरवठा अधिकारी सुरज ढोणे आदी उपस्थित हाते.आरमाेरीच्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची विचारपूस करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कुमारी उईके यांनी अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, शहर अध्यक्ष अमीन लालानी हजर होते.ना. राजेश टाेपे हे राष्ट्रवादीच्या काेट्यातून आराेग्यमंत्री झाले आहेत. आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत ते विदर्भाच्या जिल्ह्यातील काेविड सेंटरची माहिती जाणून घेत आहेत. त्या अनुषंगाने भेटी दिल्या जात आहेत.

देसाईगंज तालुक्यातही केली पाहणीदेसाईगंज तालुक्यातील कोविड सेंटर भगतसिंग वाॅर्ड व गोकुल नगरातील  कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांबोळे यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तालुक्यात याेग्य उपचाराची सोय नसल्यामुळे किरकाेळ आजारी रुग्णांना गडचिरोलीला पाठवावे लागते. त्यामुळे देसाईगंजच्या रुग्णालयात व काेविड सेंटरमध्ये सर्व  सोयीसुविधा करण्याची गरज आहे. यावेळी कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष भुवन लिल्हारे,  शहर अध्यक्ष लतीफ शेख, सोशल मीडिया विभाग तालुका अध्यक्ष कपिल बोरकर, रायुकाँचे शहर अध्यक्ष दीपक नागदेव, भरत देहलानी उपस्थित होते. दरम्यान यावेळी पदाधिकाऱ्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची साेयीसुविधांबाबत विस्तृत चर्चा केली.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या