शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला ‘बुस्टर’ची गरज

By admin | Updated: June 11, 2017 01:22 IST

राज्यात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यात जरा उशिराच पोहोचली.

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यात जरा उशिराच पोहोचली. उशिरा का होईना, या जिल्ह्यात शेतकऱ्यांविषयी तळमळ असणारे कोणी आहे हे गेल्या ५-६ दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने कुठे ना कुठे आंदोलन सुरू ठेवून शिवसेनेने दाखवून दिले. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची हिंमत जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये अजून आली नसली तरी अधिकाऱ्यांना निवेदन वगैरे देऊन त्यांनी आपल्या परीने शेतकऱ्यांच्या आंदोलनात सूर मिसळला आहे. भाजप सत्तेतील प्रमुख पक्ष असल्यामुळे भाजपचे पदाधिकारी सरकारला धारेवर धरणार नाही, पण या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अजूनपर्यंत कुठेच दिसत नसल्याने ही बाब अनेकांना खटकत आहे. एकेकाळी हा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. अगदी तीन वर्षांपूर्वी सरकारची खांदेपालट होण्यापूर्वीसुद्धा राष्ट्रवादीचे या जिल्ह्यावर बऱ्यापैकी वर्चस्व होते. याच पक्षाचे नेते आर.आर.पाटील यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाडलेली छाप लोकांच्या स्मरणात आहे. ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते शेतकऱ्यांचे ‘जाणता राजा’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखले जातात, त्या पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी शेतकऱ्यांच्या विषयात एवढे उदासीनता कसे झाले? याच पक्षाचे नेते देशाचे कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली होती. त्यामुळे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तर उजळ माथ्याने रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी करता आली असती, पण ती संधीही ते गमावत आहेत. सत्ता गेली की शहाणपणही जाते, असे म्हणायला हरकत नाही. लोकशाहीत निवडणुकीच्या रुपाने होणारी खांदेपालट ही काही नवीन गोष्ट नाही. तव्यावरची पोळी जळू नये म्हणून जसी पलटविणे गरजेचे असते तसे लोकशाहीत लोक सत्ता पलटवितात. पण अनेक वर्षे सत्तेत राहिल्यामुळे की काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचेही पदाधिकारी आंदोलन करणेच विसरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर एवढा ‘विकनेस’ आला आहे की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना ‘बुस्टर डोज’ देण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवसेनेचे आंदोलन रोज सुरू आहे. अर्थात त्या आंदोलनात शेतकरी किती असतात हा भाग निराळा. आपण सत्तेत नसून विरोधी पक्षातच आहोत या आवेशात त्यांचे आंदोलन असते. पण एकीकडे सत्तेला चिकटून राहायचे आणि दुसरीकडे आपल्याच सरकारविरूद्ध आंदोलन करायचे, ही दुहेरी निती मात्र सर्वसामान्यांच्या समजण्यापलिकडची आहे. यामुळेच सेनेच्या मंत्र्यांचे खिशात राजीनामे घेऊन फिरण्याचे विधान सोशल मिडियावर हास्यास्पद ठरते. काहीही असो, आपले सरकार चुकत आहे तर त्यांच्याविरूद्ध जाहीरपणे आंदोलन करण्यासाठीही हिंमत लागते. शिवसेनेच्या या हिमतीला दाद दिलीच पाहिजे.