शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:23 IST

पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे आवाहन : सी-६० व सीआरपीएफ जवानांचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केले.जिल्हा पोलीस मुख्यालयाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट देऊन पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे अभिनंदन केले. तसेच दोन नक्षली कारवायांत ४० नक्षल्यांना ठार करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील सी-६० जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले. ही अतिशय खडतर परिस्थितीत राहून प्रभाविपणे सातत्त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर यश मिळविल्याचे नमूद करीत गृह राज्यमंत्र्यांनी कसनासूर व नैनेर जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी सी-६० पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सीआरपीएफ जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे आभार मानत आपल्या प्रेरणेमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य वाढले आहे. गडचिरोली पोलीस दल प्रामाणिकपणे भविष्यात काम करत राहील. तसेच नक्षल्यांविरोधातील मोहीम तत्परतेने राबविली जाईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी