शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी युद्ध नव्हे बुद्धाचे विचार स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:58 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांचे आवाहन : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले. आपल्यावर अन्याय झाला, असे नक्षलवाद्यांना वाटत असेल तर त्यांनी बंदुकी सोडून शांतीच्या मार्गाने वाटाघाटी कराव्या, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.रामदास आठवले हे गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. देशभरात २ कोटी ६७ लाख नागरिक तर गडचिरोली जिल्ह्यात नऊ हजार नागरिक विकलांग आहेत. अपंग विकास महामंडळामार्फत त्यांना रोजगारासाठी मदत केली जात आहे. त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. केंद्र शासनामार्फत त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जात आहेत. भटक्या जमातींचे पुनर्वसन करून त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. वृद्धाश्रम उघडण्यासाठी एखादी सामाजिक संस्था पुढे आल्यास त्याला परवानगी देऊन अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल.विदर्भात झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठे जंगल होऊ शकत नाही. सदर जमीन गरजू शेतकºयांना कसण्यासाठी द्यावी, यादृष्टीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. रॉफेल खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड राहुल गांधी करीत असले तरी या आरोपामध्ये काही तत्थ्य नाही. महागाईनुसार थोडीफार किंमत वाढली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या आठ हजार विद्यार्थी व अनुसूचित जमातीच्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये २०० आंतरजातीय विवाह पार पडले. या जोडप्यांना राज्य शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. केंद्र शासनाकडून दोन लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. संबंधित जोडप्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या व राहण्याच्या व्यवस्थेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात २०१६-१७ यावर्षात २४, २०१७-१८ या वर्षात ४७ व २०१८-१९ मध्ये ४० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले