शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकार संघटनेतर्फे नक्षलवाद्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:12 IST

नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, .....

ठळक मुद्देशासनाकडे मागणी : नक्षलपीडित कुटुंबांना मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.भारतीय मानवाधिकार परिषद संलग्नित नक्षलपीडित पुनर्वसन समितीने नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी याप्रसंगी केली. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दुर्गम भागातील नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. हत्या झाल्यानंतर नागरिकांचे कुटुंब उघड्यावर पडते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाईमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. कसनासूर गावात नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी मारल्या गेले होते. या घटनेत पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती गावकऱ्यांनी दिली, असा संशय घेत नक्षलवाद्यांनी कसनासूर गावातील मालू मडावी, कन्ना मडावी, लालसू कुडयेटी यांची हत्या केली. त्यामुळे गावातील नागरिकांना गाव सोडून पोलीस मदत केंद्रात आश्रय घ्यावे लागले. या घटनेमुळे दुर्गम भागातील आदिवासी व नक्षलपीडित नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे, असे मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांविरोधात मानवाधिकार परिषदेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात नक्षलवाद्यांचा निषेध करून नक्षलपीडित कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रूपयांची मदत द्यावी, एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी द्यावी, नक्षल्यांच्या भीतीने गाव सोडून भटकणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, शहरी भागातील नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.निषेध नोंदविताना मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, व्ही.एन.मडावी, मधुकर उसेंडी, मनोज कांदो, संदीप वाघमारे, साईनाथ पेंडालवार, सुरेश नरोटी, बाबुराव धुर्वा, मनोज कोवासे, अशोक कोरसामी, सतीश गोटा, राजेश लेकामी, राजू दुर्वा, मधुकर मट्टामी, पेका मट्टामी, दुलसा नरोटे, लालसू नरोटे, रोशन बावणे, गौतम मेश्राम, सोनल पुंगाटी, अविनाश मेश्राम, संदीप मडावी, सचिन खोब्रागडे व नक्षलपीडित हजर होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी