शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षल्यांनी केली पोलीस पाटलाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 11:43 IST

नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून लांझी येथील पोलीस पाटलाची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून आणि दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली.

ठळक मुद्देझोपेतून उठवून नेले खबऱ्या असल्याचा संशय होता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून लांझी येथील पोलीस पाटलाची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून आणि दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. कटीया पेका कुमोटी (६०) असे मृत पोलीस पाटलाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली या तालुका मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांझी या गावाचे पोलीस पाटील कटीया कुमोटी हे गावापासून १ किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतातील घरात पत्नी, मुलगा व सून यांच्यासह राहतात. बुधवारी रात्री ते घरात झोपलेले असताना ३ महिला व ३ पुरूष असे सहा सशस्त्र गणवेषधारी नक्षलवादी तिथे आले. त्यांनी कुमोटी यांना झोपेतून उठवून त्यांचे दोन्ही हात मागे दोरीने बांधले व जंगलाच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी कुटुंबातील लोकांना त्यांना नेऊ नका अशी विनवणी केली, पण नक्षल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.दरम्यान गुरूवारी (दि.२२) सकाळी ताडपल्ली मार्गावर त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी लिहीलेली होती. त्यात काही दिवसांपूर्वी लांझी गावाजवळ झालेल्या नक्षल चकमकीत एक नक्षलवादी पोलिसांकडून मारल्या गेला. त्यावेळी कुमोटी यांनीच पोलिसांना नक्षल्यांची माहिती दिली असून तो पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या चिठ्ठीवर कसनसूर एरिया कमिटीचा उल्लेख आहे. तालुक्यातील सुरजागड लोहखनिज वाहतुकीच्या संरक्षणासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात असतानाही नक्षली हिंसक घटना घडविण्यात यशस्वी होत आहेत. काही दिवसांपूर्वी बुर्गी येथे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील कोंबड बाजारात भरदिवसा एकाची नक्षल्यांनी हत्या केली होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी