शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो; दीड कोटींच्या नुकसानाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:53 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले.

ठळक मुद्देघोट येथील घटना१५ ते २० सशस्त्र नक्षल्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले.मध्यरात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी घोट येथील लाकूड डेपोवर गेले. त्यापैकी दोघे चौकीदाराकडे आले तर बाकींनी रॉकेल ओतून बांबू व लाकडांना आग लावली. या घटनेनंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गडचिरोली व अहेरी येथील अग्निशमन वाहन तसेच आलापल्ली येथील वनविभागाचे वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बरीच लाकडे जळून राख झाली होती. हे लाकडी बिट वनविभागासह जंगल कामगार सहकारी संस्थांचे असल्याची माहिती आहे.घटनास्थळी नक्षल्यांनी टाकलेली पत्रकेही टाकली. ३० मार्चला एटापल्ली तालुक्यातील रेकनार-हुमडी येथील जंगलात झालेली पोलिस-नक्षल चकमक बनावट असून, सोनू उसेंडी यास खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज एटापल्ली तालुका बंदचे आवाहन त्या पत्रकातून केले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून या आगीत सुमारे दीड लाखांचे लाकूड भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीfireआग