शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीतील जंगलात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 10:18 IST

अहेरी तालुक्यातील सांड्रा जंगल परिसरात रविवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत धानोरा तालुक्यातील लहान झेलिया जंगल परिसरात चकमकीनंतर घेतलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

ठळक मुद्देसांड्रा परिसरात पोलीस-नक्षली आमनेसामनेदुसऱ्या घटनेत नक्षल साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : अहेरी तालुक्यातील सांड्रा जंगल परिसरात रविवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत धानोरा तालुक्यातील लहान झेलिया जंगल परिसरात चकमकीनंतर घेतलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.अहेरी तालुक्यातील उपपोलीस स्टेशन दामरंचाअंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील सांड्रा व जारागुडम जंगल परिसरात पोलिसांतर्फे नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. या चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार झाला आहे. काही वेळानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. घटनास्थळाचा शोध घेतला असता, एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्याकडे १२ बोअर रायफल आढळून आली. वृत्त लिहिपर्यंत मृत नक्षलवाद्याची ओळख पटली नव्हती.

लहान झेलिया जंगलातून भुसूरूंगाचे साहित्य जप्तधानोरा तालुक्यातील कटेझरी परिसरातील लहान झेलिया जंगलात पोलिसांतर्फे नक्षलविरोधी मोहीम राबविली असताना रविवारी सकाळी १० वाजता चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव बघून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावर पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता, त्या ठिकाणी डिटोनेटर, बॅटरीचे सेल, वायर असे भूसुरूंग स्फोट घडवून आणण्याचे साहित्य आढळून आले. हे सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी