शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ मृत नक्षलवादी होता पेरमिली दलमचा कमांडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 15:38 IST

दलम कमांडर सोमा उर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील अनेक ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी (दि.३) झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली असून तो पेरमिली दलम कमांडर कोटे अभिलाष उर्फ चंदर उर्फ शंकर उर्फ सोमा (३६) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर राज्य शासनाने आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभाग अंतर्गत मौजा येलदमडी जंगल परिसरात शुक्रवारी सायंकाळी सी-६० कमांडोंसोबत नक्षलवाद्यांची चकमक उडाली होती. त्यानंतर घेतलेल्या शोधमोहिमेत एका मृतदेहासह एक बंदूक, दोन प्रेशर कुकर, वायर बंडल, दोन वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, २० पिट्टू आणि इतर नक्षल साहित्य पोलीस पथकाच्या हाती लागले होते. शनिवारी (दि.४) मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्यात यश आले.मृत सोमा उर्फ शंकर हा तेलंगणा राज्यातील कारापल्ली (जि. मुलुगू) येथील रहिवासी होता. तो २००८-०९ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. २०१२-१३ पासून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना २०१८-१९ मध्ये त्याच्याकडे पेरमिली दलम कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याच्या मृत्यूमुळे नक्षल दलमला हादरा बसला आहे.विविध ठाण्यात १५ गुन्ह्यांची नोंददलम कमांडर सोमा उर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील अनेक ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचे ५ गुन्हे, चकमकीचे ५ गुन्हे, जाळपोळीचे ३, दरोड्याचा १ आणि इतर १ अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या जहाल नक्षलवाद्यास कंठस्नान घालणाऱ्या सी-६० कमांडोंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना रोख पारितोषिक जाहीर केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी