शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल आॅपरेशनच्या हेलिकॉप्टरचे सारथ्य प्रथमच महिला पायलटकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:15 IST

अलिकडच्या काही वर्षात पोलिसांच्या गाड्यांवर चालकाच्या सीटवर दिसणाºया महिला पोलीस शिपाई कुतूहलाचा विषय झाल्या होत्या.

ठळक मुद्देपायलट मयुरी देशमुख रुजू : नक्षलग्रस्त भागातील मुलींना गगनभरारीची प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अलिकडच्या काही वर्षात पोलिसांच्या गाड्यांवर चालकाच्या सीटवर दिसणाºया महिला पोलीस शिपाई कुतूहलाचा विषय झाल्या होत्या. पण आता नक्षलग्रस्त भागात प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत पोलीस जवानांना ने-आण करण्यासोबतच जखमींना तातडीने उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाºया पोलिसांच्या हेलिकॉप्टरचेही सारथ्य एक महिलाच करणार आहे. मयुरी देशमुख असे त्या जाँबाज पायलटचे नाव आहे.गेल्या ३ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलिसांच्या सेवेत असलेल्या पवनहंस या सरकारी हेलिकॉप्टरवरची धुरा मयुरी यांनी सांभाळली आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी शिवाजीराव बारवकर यांची नात असलेल्या मयुरीला हवाई सेवेचा वारसाच लाभला आहे. २००८ मध्ये अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००९ मध्ये त्यांची पायलट म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडिल विश्वासराव देशमुख हे सुद्धा भारतीय वायुसेनेत ग्रुप कॅप्टनपदी कार्यरत होते. मयुरीची लहान बहीण राधिकासुद्धा खासगी विमान कंपनीत पायलट आहे. मयुरी देशमुख यांनी एटापल्लीच्या भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनींसमोर आपले अनुभव सांगितले.अन् दहावीच्या मुली भारावल्यायशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास व ध्येय गाठण्याची चिकाटी ठेवण्याचा सल्ला मयुरी यांनी भगवंतराव महाविद्यालयाच्या मुलींना दिला. आता या भागातील मुलींनीही घराबाहेर पडून पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे मुली भारावून गेल्या. यावेळी एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी, पो.नि. आचेवार, प्राचार्य डॉ.एस.एन.बुटे, एस.एन.पठाण उपस्थित होते. संचालन प्रा. किशोर बुरबुरे यांनी केले.