शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त मुत्तापूर गाव नागपूर विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 22:11 IST

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानात भरीव कामगिरी : २०१५-१६ वर्षात जलसंधारणाची अनेक कामे मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे केली जात आहेत. सन २०१५-१६ या वर्षात सदर अभियानात उत्कृष्ट काम करणाºया अहेरी पंचायत समितीमधील महागाव ग्रामपंचायतीतील मुत्तापूर गावाने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केला आहे. याशिवाय धानोरा तालुक्यातील जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवे स्थान मिळाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन क्षेत्र वाढवून टंचाईमुक्त महाराष्टÑ घडविण्यासाठी सन २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५३ गावांची आराखड्यात निवड करण्यात आली. या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची जलसंधारणाची विविध कामे मंजूर करण्यात आली. तीन हजार पेक्षा अधिक कामे करणाºया पाच गावांची निवड सन २०१५-१६ पुरस्कारासाठी प्रशासनामार्फत करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील मुत्तापूर, धानोरा तालुक्यातील जप्पी, भामरागड तालुक्यातील कोठी, एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी व गुरूपल्ली आदी गावांचा समावेश आहे. या पाच गावात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तपासणीनंतर पुरस्कार समितीपुढे हे प्रस्ताव समितीने मुत्तापूर गावाची निवड प्रथम पुरस्कारासाठी केली. तसेच जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवा क्रमांक दिला आहे.३२ हजार घ.मी. जलसंचयमहागाव ग्रा.पं. अंतर्गत मुत्तापूर / दिनचेरपल्ली हे गाव आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर वसले आहे. येथील लोकसंख्या ३४७ असून जवळपास १३५ हेक्टर शेतजमीन आहे. येथे १५ तलाव, चार बोड्यांचे नविनीकरण असे एकूण २२ कामांचे नियोजन करण्यात आले. या कामातून ३२ हजार ९४० घन मीटर जलसंचय अपेक्षीत आहे.