शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

चकमकीत नक्षल्यांचे शिबीर उद्ध्वस्त, घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 12:33 IST

२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात पोलीस दलास यश आले.

ठळक मुद्देआयईडी व कुकर बॉम्ब लावून आखली होती मोठी घातपाताची योजना

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला.भामरागड तालुक्यातील जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलींचे शिबीर उद्ध्वस्त झाले. यात कोणी जखमी झाले नसले तरी त्यानंतर राबविलेल्या शोधमोहीमेत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. 

उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्याांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. 

२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले.

आयईडी, कुकर बॉम्ब केले नष्ट

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून होते असे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्टू बॅग व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी व कुकर बॉम्ब जागेवरच नष्ट करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विशेष अभियान पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी