शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली ब्लास्टच्या घटना शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 01:40 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस व माओवाद्यात वारंवार चकमकी उडत आहेत;

नक्षलग्रस्त भागात अभियान वाढले : २६ महिन्यांत पोलिसांचे यश गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस व माओवाद्यात वारंवार चकमकी उडत आहेत; परंतु पोलीस यंत्रणेच्या अभियानात प्रचंड सतर्कता आल्यामुळे गेल्या २६ महिन्यांत नक्षलवाद्यांकडून ब्लास्टची (स्फोटाची) एकही घटना घडलेली नाही. उलट पोलीस प्रशासनाला माओवाद्यांनी लावलेले अनेक भूसुरूंग उद्ध्वस्त करण्यात कमालीचे यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात माओवादी कारवायांचा उदय झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. माओवाद्यांशी असलेले हे युद्ध जंगलात लढताना पोलिसांना विविध युद्धाचा सामना करावा लागत होता. माओवाद्यांकडून ठिकठिकाणी स्फोटक पेरून भूसुरूंग करण्यात येत होते. २००५ मध्ये ब्लास्टच्या एकूण १० घटना घडल्या. २००६ मध्येही तेवढ्याच घटना झाल्यात. २००७ मध्ये १३ ब्लास्ट झाले तर २००८, २००९ मध्ये प्रत्येकी दोन ब्लास्ट माओवाद्यांकडून करण्यात आले. २०१० मध्ये चार ब्लास्ट झाले तर २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये दोन व २०१३, २०१४ मध्ये प्रत्येकी चार-चार भूसुरूंग स्फोट माओवाद्यांनी केलेत. मात्र २०१५, २०१६ तसेच २०१७ च्या २८ फेब्रुवारीपर्यंत एकही ब्लास्ट गडचिरोली जिल्ह्यात झाला नाही. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत सी-६० पथक निर्माण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिवसा व रात्री गस्ती वाढल्या. नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहू लागली. पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत झाले. त्यामुळे ब्लास्टच्या बाबतही गुप्त माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ उपलब्ध होऊ लागली. या साऱ्या बाबी माओवाद्यांसाठी डोकेदुखी ठरल्या. त्यामुळे मागील २६ महिन्यांत नक्षली ब्लास्टची एकही घटना घडलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)