शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल बंदला झुगारून गडचिरोलीत नागरिकांनी उभारले स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 10:58 IST

पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला.

ठळक मुद्दे२०१२ मध्ये झाली होती हत्यागावकऱ्यांनी मोकळा केला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले. एवढेच नाही तर २०१२ मध्ये नक्षल्यांकडून हत्या झालेल्या गजानन मडावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात स्मारकही उभारण्यात आले.नक्षलवाद्यांनी २०१२ साली जारावंडी येथील गजानन मडावी यांची निर्घृण हत्या केली होती. नक्षल बंदचे निमित्त साधत गावकऱ्यांनी मडावी यांच्या स्मरणार्थ व नक्षलवाद्यांच्या निषेधार्थ एकत्र येत गावात त्यांचे स्मारक उभे केले. गावकरी नक्षलवाद्यांच्या राक्षसीपणाला कंटाळले असून त्यांची आता आमच्याशी गाठ आहे, अशा आशयाची कविता एका आदिवासी युवकाने सादर करून आदिवासींच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी लावलेल्या बॅनर्सची वेगवेगळ्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत होळी केली. बंद यशस्वी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्यावर तोडून टाकलेली झाडे गावकऱ्यांनी स्वत: बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली.असा बंद आपल्यावर लादून नक्षली आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत. ते सूडाच्या भावनेतून आदिवासींवर अत्याचार करत असून त्यांचा नाहक खून करत आहेत. त्यांनी हे त्वरित थांबवावे अन्यथा आम्हा गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होईल, अशी प्रतिक्रि या गावकऱ्यांनी व्यक्त करून नक्षलवाद्यांविरोधात घोषणा दिल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले.दरम्यान धानोरा तालुक्यातील मुरूमगाव-सावरगाव मार्गावर नक्षल्यांनी आडवी टाकलेली झाडे उचलल्यानंतर रात्री ८ वाजता या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. शुक्रवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी