शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

गडचिरोलीतील कमलापुरात नक्षल्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:37 IST

एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन करणारे बॅनरही चौकात झळकवले.

ठळक मुद्देचौकात झळकवले बॅनरखांबावरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन करणारे बॅनरही चौकात झळकवले.२० ते २२ मेदरम्यान नक्षल्यांनी जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी धुमाकूळ घातला. धानोरा-राजनांदगाव मार्गावर बुधवारी ४ वाहने जाळल्यानंतर गुरूवारच्या पहाटे कमलापुरात धुमाकूळ घातल्याचे समोर आले. कमलापूरमध्ये नक्षलींच्या हालचाली टिपण्यासाठी दोन खांबांवर प्रत्येकी दोन-दोन असे चार सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. नक्षलवाद्यांनी त्यावर बांबूने प्रहार केला. त्यामुळे त्यांचे थोडे नुकसान होऊन दिशाही बदलली. त्यानंतर चौकात एक कापडी बॅनर बांधून काही पत्रकेही तिथे टाकली. त्यात नक्षली नेता सृजनक्काच्या चकमकीतील मृत्यूचा निषेध म्हणून दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. अहेरी एरिया कमिटी असे बॅनरवर नमूद आहे.

म्हणून नक्षलवादी कॅमेऱ्यात कैद झालेच नाहीदरम्यान रेपनपल्ली उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे यांना विचारले असता, नक्षलवाद्यांनी बांबूने प्रहार केल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली असून ते खराब झालेले नाही, चालू स्थितीत असल्याचे ते म्हणाले. मात्र रात्री विजा चमकत असल्यामुळे कॅमेरे बिघडू नये म्हणून बंद करून ठेवले होते. त्यामुळे संबंधित नक्षलवादी कॅमेऱ्यात कैद होऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी