शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मार्गाची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:47 IST

तालुक्यातून छत्तीसगडमध्ये जाणारा व गडचिरोलीकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग जागोजागी खड्डे पडल्याने दुरवस्थेत आहे. या मार्गाने ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : छत्तीसगडमधून येणाऱ्या जड वाहनांमुळे रस्ता खड्डेमय

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातून छत्तीसगडमध्ये जाणारा व गडचिरोलीकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग जागोजागी खड्डे पडल्याने दुरवस्थेत आहे. या मार्गाने ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.धानोरावरून छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. शिवाय छत्तीसगड राज्यातूनही गडचिरोलीकडे नियमित जड वाहने येत असतात. दिवसभर येथून वाहनांचे आवागमन असते. शिवाय प्रवाशी मोठी वाहने व प्रवाशी लहान वाहने यांचाही वाहतुकीमध्ये समावेश होतो. शिवाय दुचाकी, चारचाकी वाहने येथून ये-जा करीत असतात. वाहनांच्या वर्दळीमध्ये मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. राजोली ते लेखापर्यंत रस्त्याची अतिशय दैैनावस्था झाली आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने किरकोळ अपघातात वाढ झाली आहे.त्यामुळे मार्गावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. दरवर्षी काही भागापुरती रस्त्याची डागडुजी केली जाते. परंतु अल्पावधीतच रस्त्याची अवस्था जैैसे थे होते. केवळ वेळ मारून नेण्याचे काम केले जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गGadchiroliगडचिरोली