शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देतालुकावासीयांना मनस्ताप : जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. एवढेच नाही तर इंद्रावती व प्राणहीता नदीवरील पुलाचे काम १८ वर्षानंतरही पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्यातील जनतेला प्रवास करणे सोईस्कर व्हावे म्हणऊन केंद्र शासनाने तेंलगणा राज्यातील निजामबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूर असा राष्ट्रीय महामार्ग बनविला. त्यातील ५६ किलोमीटरचा रस्ता सिरोंचा तालुक्यातून जातो. या मार्गासाठी कोटयवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग सुस्थितीत नाही.याशिवाय सिरोंचा ते असरअल्ली यादरम्यान महामार्गाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. जिकडे-तिकडे गिट्टी उखडून खड्डे पडले आहेत. १९९८-९९ मध्ये सीमा रस्ता संघटना -(बी.आर.ओ.)च्या माध्यमातून या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू करण्यात आले. सिरोंचा येथे कार्यालय देखील बांधण्यात आले. सिरोंचा येथून पातागुड़म असा ६५ कि.मी. अंतराचा या राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला होता. या महामार्गात महाराष्ट्र तेलंगना यांना जोड़णारा प्राणहिता नदीवरील पूल व महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा पातागुड़म गावाजवळील इंद्रावती नदीवरील पूल होता. या पुलांचे काम अंतिम टप्प्यावर असले तरी कासवगतीने चालत आहे.याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकड़े तक्रारी देण्यात आल्या तरी ड़ोळेझाकपणा केला जात आहे. सिरोंचा ते असरअल्ली हा ३२ कि.मी.पर्यतचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून करावा लागतो. ग्रामीण मार्गापेक्षाही या मार्गाची स्थिती बिकट झाली आहे. शासनाने त्वरित या राष्ट्रीय महामार्गाकड़े लक्ष देऊन दुरूस्ती करावी अशी मागणी तालुकावासियांकडून केली जात आहे

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग