शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या मुलाखतींवरून ठरणार राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:28 IST

स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत.

ठळक मुद्दे १ ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यात सर्वेक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या विचारांना १०० पैकी सुमारे ३५ टक्के गुण देण्यात आले आहेत.देशभरातील ९८ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. या गावांमध्ये शाश्वत स्वच्छता राहावी, यासाठी भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ग्रामपंचायतीचे गुणांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत त्रयस्त संस्थेच्या वतीने गुणांकन होणार आहे. एकूण १०० गुण आहेत. यामध्ये स्वच्छतेबाबतच्या सोयीसुविधांसाठी ३० गुण राहतील. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव जागृती, नागरिकांचे अभिप्राय, प्रभावी व्यक्तीचे अभिप्राय यांना ३५ गुण राहणार आहेत. तर स्वच्छतेसंबंधी जिल्ह्याने व संबंधित राज्याने केलेली प्रगती यावर ३५ गुण राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतीची सर्वेक्षणासाठी नमुना पध्दतीने निवड केली जाणार आहे. त्या गावांना सर्वेक्षणकर्ते भेटी देऊन सोयीसुविधांची पाहणी व नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. सर्वेक्षणासाठी कोणत्या गावांची निवड होणार आहे, याबाबतची माहिती अतिशय गोपनिय ठेवली जात आहे. गावांची नावे सर्वेक्षणकर्त्यांना दिल्ली येथून त्याच दिवशी अगदी वेळेवर कळविले जात आहेत. यामुळे सर्वेक्षणात पारदर्शकता राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर टीम सोमवारी दाखल झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान