शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर जाळून गावकऱ्यांनी केला नक्षल सप्ताहाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 18:07 IST

गडचिरोली, दि. 27 - येत्या 28 जुलैपासून सुरू होत असलेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी कापडी बॅनर लावून सप्ताहादरम्यान व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र धानोरा तालुक्यातील मरकेगावच्या परिसरात लावलेले बॅनर गावातील महिला-पुरुषांनी एकत्रित येऊन रस्त्यावर जाळले आणि नक्षल सप्ताहाला प्रथमच खुलेआम विरोध दर्शविला.अतिदुर्गम आदिवासी भागातील गावक-यांनी एकजुटीने नक्षल ...

गडचिरोली, दि. 27 - येत्या 28 जुलैपासून सुरू होत असलेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी कापडी बॅनर लावून सप्ताहादरम्यान व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र धानोरा तालुक्यातील मरकेगावच्या परिसरात लावलेले बॅनर गावातील महिला-पुरुषांनी एकत्रित येऊन रस्त्यावर जाळले आणि नक्षल सप्ताहाला प्रथमच खुलेआम विरोध दर्शविला.अतिदुर्गम आदिवासी भागातील गावक-यांनी एकजुटीने नक्षल सप्ताह न पाळण्याचा निर्धार केला. आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले? आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळुन आमचा विकास का थांबवायचा? असा परखड सवाल करत गावक-यांनी नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठवला आहे.जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात, जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही अशी भावना आदिवासी दुर्गम भागातील गावक-यांनी व्यक्त केली. ज्या मरकेगाव भागात 2009 मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा घडवुन 15 पोलीस जवानांना मारले त्याच भागात आता सामान्य आदिवासींकडून नक्षलवाद्यांना विरोध होत आहे.