शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायती रखडल्या

By admin | Updated: November 26, 2014 23:07 IST

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात

गडचिरोली : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आठ गावांमध्ये नगर पंचायती निर्माण होणार होत्या. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचे काम रखडलेले आहे.काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने राज्यातील मोठ्या गावांमधील तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला जाणार होता. याबाबत अधिसूचना जारी करून नागरिकांकडून हरकतीही मागण्यात आल्या होत्या. मात्र वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही नगर पंचायतीच्या स्थापनेबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारची ही घोषणा हवेतच विरली आहे. आरमोरी व चामोर्शीला नगर पालिकेचा दर्जा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात मागील नागपूर अधिवेशनात उपोषणही करण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने नगर पंचायती निर्माण करण्याचे पिल्लू सोडून नवीन नगर पालिका निर्माण करण्याचे कामही प्रलंबित ठेवले आहे. नगर पंचायती निर्माण झाल्यास संबंधीत ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीमध्ये वाढ होईल व या गावांच्या विकासावर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रीत करता येईल, अशी राज्य सरकारची भूमिका होती. परंतु या प्रश्नावर पुढे कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. अलिकडेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रमही काही भागात राज्य सरकारने घोषित केला. त्यामुळे सरकार आता नव्याने या निर्णयावर अंमलबजावणी करते की काय, अशी शक्यता आहे. राज्यात सत्तांतरण होऊन भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. आघाडी सरकार असतांना आरमोरीला नगर पालिकेचा दर्जा द्यावा म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे उपोषण केले होते. आता त्यांनी राज्य सरकारवर दबाव ठेवून आरमोरी व चामोर्शी या दोनही ग्रामपंचायतींचे नगर पालिकेत रूपांतर करावे, अशी मागणी जनतेने केली आहे. २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात ही नगर पंचायत स्थापन होईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वच तालुका मुख्यालय नगर पंचायतसाठी पात्र ठरतील, असे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनीही जाहीर केले होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)