शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मुके, बहिरेपणाला साद घालावी कुणी?

By admin | Updated: June 20, 2017 00:43 IST

घरात आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यात माणसाच्या संसाराची दुरवस्था होत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे जीवन जगणे किती कठीण होत असेल,..

योजनांचा लाभ नाही : देलनवाडीच्या बावणे कुटुंबीयांचे जीवन खडतरप्रदीप बोडणे । लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : घरात आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यात माणसाच्या संसाराची दुरवस्था होत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे जीवन जगणे किती कठीण होत असेल, याची कल्पना न केलेली बरी. संघर्षमय प्रवास असलेली, अशा प्रकारची करूण कहाणी देलनवाडी येथील बावणे कुटुंबाची आहे. ताराबाई बावणे या कर्णबधीर आहेत तर त्यांची मुलगी पिंकी ही मतीमंद व मुकी आहे. दहा वर्षापूर्वी नकटू बावणे यांचा मृत्यू झाला आणि बावणे कुटुंबाचा आधारवड हरपला. मतीमंद व बधीर मुलीच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी कर्णबधीर असलेल्या ताराबाई बावणे यांच्यावर आली. मुके व बहिरेपणात मायलेकीच्या दारिद्र्याचा अंधार अधिकच गडद झाला. मतीमंद व मुक्या मुलीच्या जगण्याचा संघर्ष ताराबाईच्या जीवनात अद्यापही कायम आहे. राहण्यासाठी स्वत:चे घरही नाही. सचिन मेश्राम याने आपले जुने घर या मायलेकींना राहण्यासाठी दिले आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. मात्र मुक्या, बहिरेपणात खडतर जीवन जगणाऱ्या ताराबाई बावणे व त्यांची मुलगी पिंकी हिला अद्यापही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना प्रतिमहिना ६०० रूपयांचा लाभ दिला जातो. मात्र सदर मायलेकींना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही. जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या बावणे कुटुंबीयाकडे अद्यापही शासन व प्रशासनाचे लक्ष नाही. देवाधर्माच्या नावावर लाखो रूपयांची उधळपट्टी करून उत्सव साजरा करणाऱ्या एकाही तथाकथीत सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही. मुके, बहिरेपणात जीवन जगणाऱ्या मायलेकीच्या आयुष्यात सहकार्य करण्यासाठी सामाजिक दातृत्व कर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. या मायलेकींना मदतीचा हात दिल्यास त्यांचे जीवन थोडेफार सुकर होईल.