शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांचे मस्टर हजेरीविना

By admin | Updated: May 19, 2016 01:12 IST

आरमोरी तालुक्यातील किटाळी गट ग्रामपंचायतीच्या वतीने सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे.

कारवाई करण्याची मागणी : सूर्यडोंगरी येथे रोहयोतून सुरू आहे मामा तलावाचे कामजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील किटाळी गट ग्रामपंचायतीच्या वतीने सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामावरील मस्टर मजुरांच्या हजेरीविना कोरे आहे. तब्बल सहा दिवसांची या कामावरील मजुरांची हजेरी नोंदविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कामावरील मजुरांना मजुरीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित यंत्रणेवरील दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मजूर व नागरिकांनी केली आहे. सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामासाठी आरमोरी पंचायत समितीमधून ८ मे रोजी संगणकीकृत मस्टर काढण्यात आले. २८० मजुरांचे मस्टर काढण्यात आले. यापैकी १६१ मजुरांनी नियमित काम केले. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी १४ मे रोजी सूर्यडोंगरी येथील मामा तलावाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी मस्टरची पाहणी केली असता ८ ते १४ मेपर्यंतचे मजुरांचे मस्टर न भरले असल्याचे आढळून आले. रोहयोच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना दररोज सुरू असलेल्या कामावरील मनुष्यबळ, तेथील व्यवस्था तसेच इतर बाबींची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र सूर्यडोंगरी येथील या प्रकारामुळे संबंधित यंत्रणा गप्प का, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. किटाळी ग्रा. पं. अंतर्गत रोहयोच्या कामात नेहमीच अशा प्रकारे आवश्यक कार्यवाही करण्यास विलंब केला जातो. रोहयो कामावरील मजुरांचे मस्टर उशिरा अथवा शेवटच्या दिवशी भरण्याचे प्रकारही येथे होत असल्याचे दिसून येते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी भेटीदरम्यान कामावर असलेल्या मजुरांची प्रत्यक्षात हजेरी घेतली येथे १६१ मजूर उपस्थित असल्याचे दिसून आले. सूर्यडोंगरी येथील असा प्रकार निदर्शनास आल्याने ग्रा. पं. स्तरावरील रोहयो कामाची रेकार्डची तपासणी करण्याची गरज आहे. (वार्ताहर)