शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:35 IST

स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे.

ठळक मुद्दे४९ पदे भरलीच नाहीत : दोघांची बदली झाल्याने लेखा व पाणी पुरवठा विभाग पांगळा

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे.गडचिरोली शहरातील जवळपास ५५ हजार लोकसंख्येला मूलभूत तसेच नागरी सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या गडचिरोली नगर पालिकेत गेल्या तीन-चार वर्षांपासून कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांना कामाचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे.जिल्हा मुख्यालयाच्या गडचिरोली नगर पालिकेत नगर पालिका संवर्गातील वर्ग ३ ची एकूण ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी १७ पदे भरण्यात आली असून २० पदे रिक्त आहेत. याच संवर्गातील वर्ग ४ ची एकूण ५२ पदे मंजूर आहेत. यापैकी ३९ पदे भरण्यात आली असून १३ पदे रिक्त आहेत.राज्य संवर्गातील वर्ग ३ ची एकूण २६ पदे नगर पालिकेच्या आस्थापनेवर मंजूर ओत. यापैकी १० पदे भरण्यात आले असून १६ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेच्या विविध विभागाचा प्रशासकीय कारभार सांभाळणाºया कर्मचारी (लिपीक) यांचे ३६ पदे रिक्त असल्याने विहित वेळेत प्रशासकीय कामकाज पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने या नगर पालिकेतील दोन महत्त्वाच्या विभागातील कर्मचाºयांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली. लेखा विभागात कार्यरत परीक्षक महेश सावंत तसेच पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दीपक चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांना भारमुक्तही करण्यात आले. त्यांच्या जागेवर अद्यापही शासनाने दुसºया कर्मचाºयाची नियुक्ती केली नाही. लेखा व पाणी पुरवठा विभागातील महत्त्वाचे पद रिक्त असल्याने या दोन विभागाचा कारभार आता ढेपाळणार आहे.गडचिरोली नगर पालिकेतील राज्य संवर्ग व नगर पालिका संवर्ग या दोन्ही मधील कर्मचाºयांचे रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी शासन व प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र या संदर्भात कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेच्या कामकाजात अडचणी येत आहेत.आरोग्य निरीक्षक मिळेनागडचिरोली नगर पालिकेचे तत्कालीन आरोग्य निरीक्षक संतोषवार हे सेवानिवृत्त झाले. त्यावेळीही आरोग्य निरिक्षकाचे एक पद रिक्त होते. मात्र आता येथील आरोग्य निरीक्षकाची दोन पदे रिक्त आहेत. ही पदे राज्य संवर्गात समाविष्ट झाली असल्याने ही पदे भरण्याची जबाबदारी संचालक नगर पालिका यांच्या कार्यालयाकडे आहे. गडचिरोली शहरवासीयांना सोईसुविधा देण्यासाठी ही दोन पदे भरणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGadchiroliगडचिरोली