शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पालिकेने हटविले पक्के अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:16 IST

स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन स्मशानघाट मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले.

ठळक मुद्देजेसीबी चालवून बांधकाम पाडले : मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन स्मशानघाट मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या पथकाने या भागातील पक्के बांधकाम जेसीबीने पाडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई पार पाडली.देसाईगंज येथील स्मशानघाट मार्गावर विर्शी तुकुम सर्वे क्रमांक ४३७/१ अ जमिनीचे मालक ब्रह्मपुरी येथील डॉ. अभयसिंग शंकरसिंग रघुवंशी व डॉ. भारत देवीदास गणवीर हे आहेत. आपल्या शेतात ये-जा करणाऱ्या मार्गावर सर्वे क्र. ४३६/१/२ या लेआऊट मधील १२ मीटरच्या रोड वर अवैधरित्या अतिक्रमण करुन बांधकाम केले जात असल्याची शेतजमीन मालकांनी पालिकेकडे तक्रार केली होती. नगर परिषदेने सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत हाजी मो. हनीफ सत्तार जादा यांना २४ जानेवारी रोजी नोटीस बजावली. मात्र हाजी मो. हनीफ सत्तार जादाने सदर जागा व सुरु असलेले बांधकाम त्यांच्या मालकीचे नसल्याचे नोटीसवर लिहून दिले. त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला जेसीबीच्या सहाय्याने चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढले.सदर कार्यवाही मुख्याधिकारी मुलानी यांच्या आदेशाने न.प. कर्मचारी हमीद पठान, उदय सोनेकर व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. न.प.ने आता शहरातील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, पालिकेने काढलेले हे अतिक्रमण नेमक्या कोणत्या व्यक्तीचे आहे व बांधकाम कोणी केले आहे. हे याबाबतची माहिती कळू शकली नाही.