शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नांवर खासदार रेल्वेमंत्र्यांना भेटले

By admin | Updated: December 6, 2014 01:30 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी मंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील या लोकसभा मतदार संघात रेल्वेचे जाळे पसरविण्यासंदर्भात प्रथम प्राधान्य दिले जाईल. तसेच वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली आहे.३ डिसेंबर रोजी अशोक नेते यांनी सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाला निधी उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले आहे. याशिवाय वडसा रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेसचा थांबा व बिलासपूर-चेन्नई एक्स्प्रेसच्या नियमित थांब्यालाही मंजुरी देणार असल्याचे सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथेही बिलासपूर-चेन्नई एक्सप्रेसचा थांबा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. वडसा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभिड तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या रेल्वे स्थानकांवर सुपर एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना त्रास होतो. ही बाब रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ब्रह्मपुरी येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मची उंची वाढविण्यासोबतच सिंदेवाही रेल्वेस्थानकावर फूट ओव्हर ब्रिजची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व बाबीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहे. नेते यांनी १९ जून २०१४ ला नागभिड येथे बैठक घेऊन रेल्वेशी संबंधीत प्रश्न दक्षिण-पूर्व मध्यरेल्वे नागपूर व बिलासपूर झोनच्या अधिकाऱ्यांनाही निदर्शनास आणून दिल्या होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)