शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

खासदारांनी ऐकली गाऱ्हाणी

By admin | Updated: April 8, 2016 01:20 IST

गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी दत्तक ग्राम येवली येथे आयोजित महाराजस्व अभियानात ..

येवलीत महाराजस्व अभियान : नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटपगडचिरोली : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी दत्तक ग्राम येवली येथे आयोजित महाराजस्व अभियानात नागरिकांच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकून समस्यांचे निराकरण केले. दरम्यान शिबिरात नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तहसीलदार डी. जी. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, नंदू काबरा, सरपंच गीता सोनकर, शोभा कोठारे, शीला कन्नाके, रवीना रोहणकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, वैद्यकीय अधिकारी देवगडे, नायब तहसीलदार खारकर, चोखाजी बांबोळे, बँक व्यवस्थापक कोहपरे, रूमाजी भांडेकर, मंडळ अधिकारी प्रकाश डांगे उपस्थित होते. शिबिरादरम्यान शासनाच्या विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. तसेच विविध कागदपत्रांच्या सोयीसुविधेसाठी सेतू सुविधा केंद्रही निर्माण करण्यात आला. भोगवटदार वर्ग- २ जमिनीचे वर्ग- १ मध्ये रूपांतर करण्याची प्रकरणे सादर करण्यात आली. तसेच सातबारा, नमुना ८ अ, उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले. तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भांडेकर तर आभार मीनाक्षी भुरसे यांनी मानले. तलाठी महेश गेडाम, निशांत भानारकर, राजू सिडाम, संजय लाडवे, रमेश खोब्रागडे, पांडू पेंदाम, रामचंद्र रायसिडाम, अरूण गेडाम यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)