शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

भामरागडात दर तीन महिन्यांत पोहोचणार खासदार

By admin | Updated: July 21, 2015 02:32 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका मात्र विकासाच्या बाबत जिल्ह्यात सर्वात मागे असलेल्या भामरागडला दहा वर्षांहून

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका मात्र विकासाच्या बाबत जिल्ह्यात सर्वात मागे असलेल्या भामरागडला दहा वर्षांहून अधिक कालावधीनंतर शनिवारी खा. अशोक नेते यांनी भेट दिली. यावेळी तेथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला व यापुढे दर तीन महिन्यांत भामरागडला आपली भेट राहील व येथील विकास कामांचा आढावा आपण स्वत: अधिकाऱ्यांकडून घेऊ, असे आश्वासन देऊन खासदार तेथून परतले.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नंतर भामरागडला भेट देणारे अशोक नेते हे दुसरे खासदार ठरले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर मागील सहा वर्षानंतर भामरागडला खासदार गेलेच नव्हते. खा. नेते यांनी भामरागड येथे पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार अरूण येरचे, संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार, पंचायत समिती सभापती रंजना उईके, उपसभापती मालू मडावी, पं. स. सदस्य भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, राजू तिर्थगिरीवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदारांनी भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती अधिकारी वर्गाकडून जाणून घेतली. दर तीन महिन्याला भामरागड येथे आढावा बैठक घेऊन कामाची प्रगती जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. रस्ता, आरोग्य, शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा, मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांच्या विकासाचे नियोजन करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेती विकासासाठी चार मोठे बंधारे मंजूर करून घेतले जातील, औद्योगिक विकासासाठी गडचिरोली-मंचेरीयल रेल्वे लाईन मंजूर केली जाईल. गडचिरोली व तेलंगणा राज्याला जोडणारा मार्ग तयार करण्यासाठी नियोजन पूर्ण झाले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती खासदारांनी दिली. संचालन संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार यांनी केले. आढावा बैठकीला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)