शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:51 IST

कुणबी समाज संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर कुणबी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतयारी जोमात : १७ डिसेंबरला गडचिरोलीत कुणबी समाज मेळावा; नॉनक्रिमिलेअरच्या मुद्यावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुणबी समाज संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर कुणबी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यादरम्यान ओबीसींच्या नॉनक्रिमिलेअरच्या मुद्यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. त्यानंतर ठोस निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.गडचिरोली येथे जिल्हास्तरावर होणारा कुणबी समाज मेळावा यशस्वी करण्यासाठी या समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व युवक कामाला लागले आहेत. जिल्ह्याच्या १२ ही तालुक्यात तालुकास्तरावर कुणबी समाज संघटनेच्या बैठका घेतल्या जात आहेत. १ डिसेंबर रोजी शुक्रवारी चामोर्शी येथे कुणबी समाज संघटनेची सभा पार पडली.यापूर्वी देसाईगंज, आरमोरी तसेच गडचिरोली येथेही सभा पार पडल्या आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून कुणबी समाज आता एकवटणार आहे. संघटन शक्ती वाढविण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी आरमोरी मार्गावर कुणबी समाज संघटनेचे कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. १७ डिसेंबर रोजी होणाºया मेळाव्यात समाजाच्या वर्ष २०१८ च्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात येणार आहे, अशी माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे, रत्नदीप म्हशाखेत्री यांनी लोकमतला दिली आहे.समाजाचे पुढारी येणार१७ डिसेंबर रोजी रविवारला गडचिरोेली येथे होणाºया मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आ. बाळू धानोरकर यांच्यासह समाजाचे अनेक राजकीय पुढारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी महाविद्यालयाच्या मैदानात प्रशस्त शामियाना उभारण्यात येणार आहे.वैचारिक प्रबोधन होणारमेळाव्यादरम्यान समाजाची दशा व दिशा समाजबांधवांना माहित व्हावी, तसेच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणते पाऊल उचलावे लागेल, याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रा. ज्ञानेश वाकुडकर, वैष्णवी डफ यांच्यासह अनेक वक्ते येथे हजेरी लावणार आहेत.