शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन

By admin | Updated: August 11, 2016 01:29 IST

ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून सदर कामे ई-निविदा प्रक्रियेतून करण्यात यावी,....

प्रमुख मागणी : ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून ती ई-निविदा प्रक्रियेतून करा गडचिरोली : ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून सदर कामे ई-निविदा प्रक्रियेतून करण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातून शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन सीईओंना देण्यात आले. या धरणे आंदोलनात ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष डी. एस. फुलझेले, उपाध्यक्ष आर. व्ही. गंजेवार, महिला उपाध्यक्ष व्ही. एस. वाढई, कोषाध्यक्ष के. जी. नेवारे, सरचिटणीस पी. बी. भांडेकर, पी. सी. बनपुरकर, व्ही. एम. पत्रे, ए. एस. कासर्लावार, एन. डी. धानोरकर, एस. जी. कुनघाडकर, के. के. कुलसंगे, बी. डी. चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील अनेक ग्रामसेवक सहभागी झाले होते. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांना ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये संघटनेने म्हटले आहे की, ग्रामपंचायतीकडे दिवसेंदिवस अनेक योजनांचा व्याप वाढत आहे. मनेरगा, १४ वा वित्त आयोग, ५ टक्के निधी, दलित वस्ती, तांडा वस्ती, नक्षल गावबंदी, वृक्षलागवड, जिल्हा वार्षिक योजना, जि. प. च्या विविध योजना व पाणीपुरवठा योजनेतून लाखो रूपयांची बांधकामे ग्रामपंचायतीच्या नावे देऊन सदर कामे कंत्राटदारामार्फत केली जातात. त्यामुळे ग्रामसेवकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. ग्रामसेवक हा तांत्रिक कर्मचारी नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी ग्रामसेवकांवर मानसिक ताणतणाव वाढला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून ती ई-निविदा प्रक्रियेतून करावी, ग्राम विस्तार अधिकारी डी. झेड. पिल्लारे यांना सेवेत घेण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)