केंद्र सरकार जनविराेधी धाेरण राबवित असल्याने गोरगरीब जनतेचे हाल होत असून महागाईने जनता त्रस्त आहे. मात्र केंद्र सरकारला जनतेसोबत काही घेणेदेणे नाही. केंद्राच्या धाेरणांचा निषेध नाेंदविण्यासाठी गुरुवारी अहेरी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने जनतेला खोटी स्वप्ने दाखवून त्यांचा अपेक्षा भंग केला आहे. ‘अच्छे दिन’ च्या नावाखाली फक्त जनतेची लुबाडणूक झाली. अनेक प्रदेशात बिफवर बंदी आहे, मात्र गोव्यात सुरू आहे. आधी दुचाकी ६० हजार रुपयात मिळत होती, मात्र आता ८० हजारात मिळत आहे. मागील साठ वर्षात देशावरचे कर्ज ५५ हजार कोटी होते. मात्र मागील सहा वर्षात १ लाख ८ हजार कोटी झाले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या वाढली आहे. सामान्य नागरिकांच्या प्रत्येक कामासाठी पैसे मोजावे लागतात, हेच काय अच्छे दिन आहेत. आधी मोबाईलची इन्कमिंग फ्री होते, मात्र आता त्यासाठीही पैसे मोजावे लागतात, असे महिला पदाधिकाऱ्यांनी आंदाेलनादरम्यान म्हटले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, नगरसेविका ममता पटवर्धन, तालुका सचिव विमल गावडे, नसरीन शेख, फरहाना शेख, जयश्री मडावी यांच्यासह महिल कार्यकर्त्या उपस्थित हाेत्या.
===Photopath===
130521\13gad_2_13052021_30.jpg
===Caption===
अहेरी येथे केंद्र शासनाचा निषेध नाेंदविताना महिला पदाधिकारी.