शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चवथ्या दिवशीही आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:34 IST

अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी सोमवारपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन चवथ्या दिवशी गुरूवारला सुरूच होते.

ठळक मुद्देविद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संघर्ष कायम : शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन चवथ्या दिवशी गुरूवारला सुरूच होते. सदर आंदोलनाची शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी केला आहे.विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू करावी. सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे. नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चवथ्या दिवशी विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गुरूवारला मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रचंड नारेबाजी करून निदर्शने केली. सातवा वेतन आयोग लागू करा, एकस्तर पदोन्नतीचा लाभ लागू करा, ३० टक्के जागा कपातीचा निर्णय रद्द करा, अनुकंपा भरतीचे आदेश तत्काळ द्या, वैद्यकीय बिलाचे प्रस्ताव मंजूर करा अशा घोषणा दिल्या.या आंदोलनात विद्यापीठ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जुनघरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव वासेकर, सचिव सतीश पडोळे यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले. हे आंदोलन तिसऱ्या टप्प्यात सुरू असून या आंदोलनाला विविध कर्मचारी संघटनेकडून पाठिंबा मिळत आहे. सदर आंदोलनामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. शासनाने मागण्यांवर लवकर निर्णय घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.जुलै महिन्यात बेमुदत संपविद्यापीठ कर्मचाºयांच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनात ८० कर्मचारी सहभागी झाले आहेत. सदर आंदोलनाचे अनेक टप्पे आहेत. १८ जून रोजी विभागीय सहसंचालक तर २५ जूनला शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जूनला एक दिवसाचा लाक्षणीक संप व त्यानंतर जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.बुधवारी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. शासनाकडे निवेदन पाठविण्यात आल्याचे डॉ.मोहुर्ले यांनी त्यांना सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठ