शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

समाज जीवनावर मोटवानी यांच्या कार्याचा ठसा

By admin | Updated: July 4, 2016 01:07 IST

व्यावसायिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जीवनात वावरणारे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी आपल्या कार्याचा ठसा समाज जीवनावर उमटविला आहे,....

विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन : जेसा मोटवानी यांच्यासह अनेकांचा सत्कारदेसाईगंज : व्यावसायिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जीवनात वावरणारे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी आपल्या कार्याचा ठसा समाज जीवनावर उमटविला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. देसाईगंज येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात आमदार वडेट्टीवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील, सिंधी समाजाचे धर्मगुरू दिलीप जग्यासी, अ‍ॅड. संजय गुरू, योगराज कुथे, परसराम टिकले, दिनेश कुर्झेकर, धनराज मुंडले, छोटे मस्जिद शोला, डॉ. पाटील, विक्की टुटेजा, हरिदास मोटवानी, राजू रासेकर, राजू आकरे आदी मान्यवर उपस्थित होते.वडसा व गडचिरोली परिसरात शाळा, कॉलेज सुरू करून जेसा मोटवानी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देसाईगंज येथील १० वर्षीय राजेश पतरंगे या आंतरराष्ट्रीय कराटेपटूचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक तसेच डॉ. पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. देसाईगंज शहरातील लोकमत सखी मंचच्या सदस्यांना याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या हस्ते भेट वस्तूंचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मेरी विल्सन, प्रास्ताविक व आभार नगरसेविका निलोफर शेख यांनी मानले. (वार्ताहर)