शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

माता व बालकांचा सर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:26 IST

महत्त्वाच्या लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही गरोदर माता व बालक वंचित राहू नये, यासाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत शोधमोहीम राबविली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या बालक व गरोदर मातांना लसीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्दे१४ जून ते ३ जुलैदरम्यान : तीन टप्प्यात वंचितांचे होणार लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महत्त्वाच्या लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही गरोदर माता व बालक वंचित राहू नये, यासाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत शोधमोहीम राबविली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या बालक व गरोदर मातांना लसीकरण केले जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये शासन सर्वच महत्त्वाच्या लस मोफत उपलब्ध करून देत असले तरी दुर्गम भागातील गरोदर माता लस घेत नाही. परिणामी तिला व तिच्या बाळाला अनेक प्रकारचे रोग होतात.ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत २८१ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील गरोदर व बालकांचा शोध घेऊन त्यांना योग्य ते लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाने मात्र जिल्ह्यातील सर्वच १ हजार ६७६ गावांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. आशावर्कर वंचित गरोदर माता व बालकांचा शोध घेणार आहेत.आरोग्य विभाग बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असला तरी अजूनपर्यंत आरोग्य विभागाला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. गावस्तरावर असलेल्या आशावर्कर गरोदर माता व लहान बालकांची नोंद ठेवतात. गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही दिला जातो. मात्र दुर्गम भागातील महिलांना रूग्णालयाचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे त्या घरीच प्रसुती होतात. प्रसुतीदरम्यान अडथळे निर्माण झाल्यास किंवा तब्येत बिघडल्यास शेवटच्या क्षणी रूग्णालयात भरती केले जाते व काही मातांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी रूग्णालयातील प्रसुतीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. यासाठी दुर्गम व ग्रामीण भागातील गरोदर माता व बालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक झाले आहे.साधन व रस्त्यांअभावी अडचणीत भरगरोदर मातांना प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास तिचे कुटुंबिय राजी असले तरी पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गरोदर मातेला रूग्णालयात भरती करणे शक्य होत नाही. परिणामी सदर मातेला गावातच प्रसुती व्हावे लागते. नदी, नाल्यांमुळे आरोग्य कर्मचारीही वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गरोदर मातांना अगोदरच भरती करणे आवश्यक आहे.तीन टप्प्यात लसीकरणसर्वेक्षणादरम्यान जे बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. त्यांना तसेच इतरांना पहिल्या टप्प्यात १६ जुलैपासून सप्ताह आयोजित करून लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण सप्ताहाचा दुसºया टप्पा १३ आॅगस्टपासून व तिसरा टप्पा १० सप्टेंबरपासून आयोजित केला जाणार आहे.बालकांना बीसीजी, पेंटा-३, गोवर, मेंदूज्वर, त्रिगुणी लस दिली जाणार आहे. गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांच्या बाकी सेवांचा लाभ दिला जाणार आहे. जोखमीच्या माता, तीव्र रक्तक्षयीत मातांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य तो उपचार केले जाणार आहेत. मानव विकास मिशनच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य