शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सर्वाधिक क्षयरुग्ण अहेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:19 IST

नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत.

ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : जिल्हाभरात १ हजार ३६१ रुग्ण क्षयरोगाने ग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे क्षयरोगामध्ये अहेरी तालुका सर्वाधिक प्रभावित असून या तालुक्यात तब्बल २३२ क्षयरुग्ण आहेत.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालये आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. मात्र शासकीय रुग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. एकूणच गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात शासकीय आरोग्याच्या सुविधा तोकड्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात हिवताप व क्षयरोगाचा प्रकोप होत असतो. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यात ११९ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. भामरागड ६९, चामोर्शी १७१, धानोरा ९५, गडचिरोली १६०, एटापल्ली ८८, कोरची ५४, कुरखेडा ८७, मुलचेरा ७४, सिरोंचा १२२ व देसाईगंज तालुक्यात ९० क्षयरुग्ण आढळून आले आहेत.अहेरी उपविभागातील सिरोंचा तालुक्यातही क्षयरुग्णांची संख्या मोठी आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम गावांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच प्रशासनातर्फे प्रभावी जनजागृती होत नाही. त्यामुळे सतत २० ते २५ दिवस खोकला असूनही बरेच नागरिक तपासणी करीत नाहीत. परिणामी अशा रुग्णांना क्षयरोग झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे क्षयरोगाबाबत नागरिकांनी दक्ष असणे गरजेचे आहे.गडचिरोली जिल्ह्यात हत्तीपाय रुग्णांची संख्या हजारावर आहे. अशा विविध रुग्णांवर वेळीच औषधोपचार करण्यासाठी दुर्गम भागात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही क्षयरोगावरील औषधसाठा नेहमीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. क्षयरोगाबाबत प्रबोधनासोबतच जनजागृतीही आवश्यक आहे. क्षयरोगावर उपचार करण्यास विलंब झाल्यास संबंधित रुग्ण दगावतो.सतत दोन आठवड्यापर्यंत खोकला असल्यास संबंधित व्यक्तींनी तत्काळ तपासणी करून घ्यावी, वेळेवेर औषधी घेतली पाहिजे. सतकर्ता बाळगून काळजी घेतल्यास क्षयरोग हा लवकरच नियंत्रणात आणता येतो. आरोग्य विभागातर्फे क्षयरुग्णांची तपासणी मोफत केली जात असून त्यांना औषधीही मोफत पुरविली जात आहे.- डॉ. सुनील मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, गडचिरोली