शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:22 IST

१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत.

ठळक मुद्दे५५ लाख खड्डे तयार : ५१ लाखांचे उद्दिष्ट, १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवडीसाठी वन विभाग सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. यावरून यावर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड होण्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जागतिक तापमानातील वाढ, हवामान, ऋतू बदल यांची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. २०१६ मध्ये राज्यभरात २ कोटी व २०१७ मध्ये चार कोटीपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. तर २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी राज्यभरात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाढल्याने गडचिरोली जिल्ह्यालाही उद्दिष्ट वाढवून दिले आहे. यावर्षी ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. वन विभाग व इतर विभागांनी सद्य:स्थितीत ५५ लाख १६ हजार १५४ खड्डे खोदले आहेत. याचबरोबर सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत सुध्दा वृक्ष लागवड होणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचा आकडा ६० लाखांच्या वर पोहोचण्याचा आशावाद वन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. वृक्ष लागवडीसाठी आता सात दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीची तयारी सुरू केली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल जुने आहे. त्यातील काही वृक्ष वयोमानानुसार करपले आहेत. त्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. वन विभागाकडे सर्वाधिक जमीन व यंत्रणा असल्याने वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वन विभागाला दिले आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याची जबाबदारी सुध्दा वन विभागाकडे सोपविली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी वन विभागाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.१ ते १० जुलैपर्यंत नागरिकांना रोपट्यांसाठी करता येईल नोंदणीवृक्ष लागवड योजनेमध्ये नागरिकांचाही सहभाग वाढावा या उद्देशाने नागरिकांना सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरात तीन स्टॉल, देसाईगंज शहरात दोन स्टॉल व इतर तालुकास्तरावर एक स्टॉल लावला जाणार आहे. या स्टॉलला वनमहोत्सव केंद्र हे नाव दिले जाईल. एका व्यक्तीला जास्तीत जास्त पाच व संस्थेला २५ रोपटे दिले जातील. लहान पिशवीतील रोपटे ८ रूपयांना व मोठ्या पिशवीतील रोपटे ४० रूपयांना सवलतीत दिले जाणार आहे. शोभीवंत झाडे, फळझाडे व सावली देणारी झाडे केंद्रावर उपलब्ध राहतील. १ ते १० जून या कालावधीत वृक्षांची नोंदणी करता येईल. ज्या दिवशी नोंदणी होईल, त्याच दिवशी संबंधित व्यक्तीला वन विभागाच्या वाहनामार्फत वृक्ष घरी पोहोचता करून दिले जातील. जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्षांच्या मागणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.विभागनिहाय खड्ड्यांची संख्यापावसाळ्यानंतर खड्डे खोदण्याच्या कामाला गती आली. शनिवारपर्यंत जिल्हाभरात ५५ लाख १६ हजार १५४ खड्डे खोदले आहेत. यामध्ये वन विभागाने ३३ लाख, एफडीसीएम १४ लाख ८ हजार, एसएफडी २ लाख ६० हजार, ग्रामपंचायत ४ लाख ८१ हजार, कृषी विभाग २४ हजार, शिक्षण ५३ हजार, उच्च व तंत्र शिक्षण ३८०, नगर विकास विभाग २ हजार ६५, सार्वजनिक बांधकाम विभाग ६ हजार ७१५, ग्राम विकास विभाग २ हजार ५२४, पोलीस विभाग ३ हजार ७५५, आदिवासी विकास विभाग १२ हजार ४७०, ऊर्जा २३०, परिवहन ५००, आरोग्य ७१५, जलसंपदा १ हजार ३४४, सहकार पणन व विपणन विभाग २ हजार ३६०, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २१५, कारागृह १००, कौशल्य उद्योजकता विभाग ३५०, महसूल ५४४, महिला व बाल कल्याण विभागाने ४ हजार १९ खड्डे खोदले आहेत. हे आकडे केवळ शासकीय विभागांचे आहेत. सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरात वृक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा आकडा ६० लाखांच्या वर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग