शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं डा जत्रेसाठी सव्वा लाखांचा अतिरिक्त निधी

By admin | Updated: February 10, 2016 01:51 IST

जत्रेसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी मार्र्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे केली होती.

ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक : भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यास होणार मदतचामोर्शी : जत्रेसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी मार्र्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने अतिरिक्त १ लाख १६ हजार रूपयांचा निधी मंजूर केला असून सदर निधी ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. मार्र्कं डादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चपासून जत्रा भरणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान अतुल गण्यारपवार यांनी ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या सार्वजनिक शौचालय निधीमधून यात्रेदरम्यान मोबाईल शौचालय उपलब्ध करून द्यावे, १ किमीच्या परिसरातील नदी काठाची स्वच्छता व नदीच्या पाण्यातील चिला काढून साफसफाई करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सर्व विभागाच्या कामांचा आढावा यादरम्यान घेण्यात आला. प्रत्येक विभागाने यात्रेपूर्वी कामे पूर्ण करावी, असे निर्देश बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले. काही विभागांचे नियोजनानुसार काम पूर्णत्वास आले आहे. मात्र काही विभागांनी अजूनपर्यंत कामास सुरुवात केली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने त्यानुसार नियोजन केले आहे. पोलीस विभाग, एसटी विभागानेही आपापल्यापरीने नियोजन केले असून त्याची तयारी सुरू केली आहे. आढावा बैठकीला मार्र्कं डादेवच्या सरपंच ललीता मरस्कोल्हे, मार्र्कं डेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, तहसीलदार यू. जी. वैद्य, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालीक धनकर, मुख्य लेखाधिकारी दामोधर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी, कार्यकारी अभियंता के. आर. घोडमारे, उपविभागीय अभियंता बी. जी. वझरकर, पोलीस उपनिरीक्षक खंडारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमित माणुसमारे, गंगाधर कोंडुकवार, पोलीस पाटील भारती आभारे, राजू शेंडे, मंडळ अधिकारी पी. एस. बोदलकर, तलाठी भरडकर, विस्तार अधिकारी डी. पी. भोगे, सचिव दिनेश सराटे, उपसरपंच सेविकांत आभारे, अभियंता मनोज रणदिवे, रोशन खोकले यासह विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)