शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मुरूम कार्यवाही थंडबस्त्यात

By admin | Updated: July 27, 2014 00:07 IST

चार दिवसांपासून संततधार पावसाने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात कहर केला. दमदार पावसामुळे चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींगच्या मागे कन्नमवार वार्ड यासह शहरातील अन्य सखल

गडचिरोली : चार दिवसांपासून संततधार पावसाने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात कहर केला. दमदार पावसामुळे चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींगच्या मागे कन्नमवार वार्ड यासह शहरातील अन्य सखल भागात पाणी साचले. पावसामुळे अंतर्गत रस्ते चिखलमय झाले. यामुळे नागरिकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागले. आताही पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचणाऱ्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची योजना न.प. प्रशासनाच्यावतीने दरवर्षी राबविण्यात येते. मात्र यावर्षी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा संप आला. त्यामुळे मुरूम टाकण्याच्या निविदा प्रक्रियेला उशीर होत आहे. या प्रक्रियेला आणखी महिनाभराचा कालावधी लोटणार असल्याने महिनाभरानंतरच पाणी साचणाऱ्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही होणार आहे. नगर परिषदेच्यावतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला पाणी साचणाऱ्या सखल भागातील मार्गांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही केली जाते. याबाबत नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत रितसर ठरावही घेतला जातो. यावर्षी मुरूम टाकण्याच्या कारवाई संदर्भात नगर परिषदेच्या स्थायी समितीत ठराव पारित झाला आहे. शहरात जवळपास ४५० ते ५०० ब्रास मुरूम टाकण्याची आवश्यकता भासत असते. याकरीता न.प. प्रशासनाला महसूल विभागाकडे रॉयल्टी भरावी लागते. मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीसाठी नगर परिषद प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराला मुरूम टाकण्याचे आदेश द्यावे लागतात. नगर परिषदेला स्वत: मुरूम टाकण्याची कारवाई करण्यासाठी न.प. प्रशासनाकडे पुरेसे वाहन व कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांमार्फतच मुरूम टाकणे शक्य आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेला अद्यापही सुरूवात झाली नाही. त्यामुळे महिनाभरानंतरच पाणी साचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर मुरूम पडणार असल्याचे चिन्ह आहेत. यामुळे नागरिकांना चिखल तुडवतच पाण्यामधून मार्गक्रमण करावे लागणार आहे. न.प. प्रशासनाने तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून अंतर्गत मार्गांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. न.प. प्रशासनाच्यावतीने पाणी साचणाऱ्या अंतर्गत मार्गाचे अद्यापही सर्व्हेक्षण करण्यात आले नसल्याची माहिती आहे. यामुळे कोणत्या वार्डातील कोणत्या अंतर्गत मार्गावर मुरूम टाकायचे याचे नियोजन अद्यापही झाले नसल्याचे समजते. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र मुरूमाचा पत्ता नाही. नगर परिषद प्रशासनाने उन्हाळ्यातच नियोजन केले असते तर आतापर्यंत पाणी साचणाऱ्या अंतर्गत मार्गावर मुरूम टाकण्याची कार्यवाही पूर्ण होणे शक्य होते. (स्थानिक प्रतिनिधी)