शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेंडेरमध्ये उभारले नक्षलवाद्यांनी स्मारक

By admin | Updated: August 2, 2015 01:41 IST

तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या नेंडेर गावात मुख्य रस्त्याच्या कडेला २७ जुलैच्या मध्यरात्री नक्षलवादी ...

परिसरात दहशत : एटापल्लीपासून २० किमी अंतर आहे गावएटापल्ली : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या नेंडेर गावात मुख्य रस्त्याच्या कडेला २७ जुलैच्या मध्यरात्री नक्षलवादी संघटनांच्या सदस्यांनी शहीद नक्षलवांद्याच्या स्मरणार्थ स्मारक उभारल्याने परिसरात दहशत पसरली आहे.हेडरी पोलीस मदत केंद्रांतर्गत नेंडेर हे गाव आहे. हेडरीपासून दहा किमी अंतरावर व पोलीस मदत केंद्र गट्टापासूनही १० किमी अंतरावरील एटापल्ली-गट्टा मार्गावर असलेल्या नेंडेर गावाच्या जिल्हा परिषद शाळेपासून ३०० मीटर अंतरावर गावाला लागूनच हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक उभारून चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. मुख्य मार्गावर हा प्रकार घडलेला असून दुर्गम व अतिदुर्गम भागात यामुळे दहशत पसरली आहे. २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. याच मार्गावर एटापल्लीपासून १२ किमी अंतरावर तसेच प्रत्येकी चार ते पाच किमी अंतरावर नक्षल पत्रक व बॅनरही माओवाद्यांनी लावले असून त्यात शहीद सप्ताह साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी नक्षलवादी संघटनेकडून एलपीजी सप्ताहादरम्यान स्मारक उभारली जातात. पिपली बुर्गी, मेढरी, वेळमागळ, कोडूनवर्ष, ताडगुळा, मंगठा, उडेरा, हाजबोळी, कुंडूम आदी ठिकाणी गावात स्मारक उभारली आहे. त्यामुळे या भागातील माओवाद्यांचा ग्रामीण जनतेवरचा प्रभाव अजुनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. (तालुका प्रतिनिधी)