शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलपीडित नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:27 IST

एकीकडे नक्षलवाद्यांनी पोलिसांना सहकार्य करणाºया नागरिकांचे हत्यासत्र सुरू केले असताना दुसरीकडे यापूर्वी नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ....

ठळक मुद्देनक्षल्यांनी केली होती हत्या : दोड्डी व राजाराम येथे लोकसहभागातून पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/अहेरी : एकीकडे नक्षलवाद्यांनी पोलिसांना सहकार्य करणाºया नागरिकांचे हत्यासत्र सुरू केले असताना दुसरीकडे यापूर्वी नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकसहभागातून त्यांचे स्मारक उभारण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे.गेल्यावर्षी २२ मे रोजी पोलिसांचा खबºया व एसपीओ (गावातील विशेष पोलीस अधिकारी) असल्याच्या संशयावरून राजाराम (खांदला )येथील व्यंकटेश मुत्ता आत्राम या आदिवासी युवकाची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजाराम येथील आदिवासी बांधवांनी स्मृती स्मारक उभारले. गुरूवारी या स्मारकाची विधिवत पूजा करण्यात आली. अहेरी उपविभागात उभारलेले हे पहिलेच स्मारक आहे.यावेळी राजाराम उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धनंजय विटेकरी, पोलीस उपनिरीक्षक खतावकर, सपाटे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांच्यासह गावातील आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शवून स्मारकाची पूजा केली व व्यंकटेश आत्राम यांना श्रद्धांजली वाहिली.एटापल्ली पोलीस स्टेशनअंतर्गत दोड्डी येथे गेल्यावर्षी तान्या ईरपा कुळयेटी व रैनू दोहे होयामी यांची नक्षलवाद्यांनी गावात येऊन निर्घृण हत्या केली होती. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २२ नोव्हेंबर रोजी दोड्डी या गावात गावकºयांच्या सहभागातून नक्षलविरोधी स्मारक बनविण्यात आले. यावेळी सर्व गावकºयांनी नक्षलविरोधी घोषणाही दिल्याचे पोलिसांनी कळविले.