शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

सोमवार ठरला आंदोलनवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST

शिवसेना, महाराष्टÑ राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) आणि प्रेरक-प्रेरिका संघाच्या वतीने गडचिरोलीत सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी शिवसैनिक रस्त्यावर : मानधनासाठी अंगणवाडी सेविका व प्रेरकांची धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिवसेना, महाराष्टÑ राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) आणि प्रेरक-प्रेरिका संघाच्या वतीने गडचिरोलीत सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांसाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात आले असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती. या आंदोलनांमुळे सोमवार ‘आंदोलनवार’ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनअंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीचे शासन परिपत्रक त्वरीत काढावे, थकीत मानधन द्यावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना सेवानिवृत्तीचा त्वरीत लाभ द्यावा, अंगणवाडीचा टीएचआर बंद करून अंगणवाडीत शिजलेला सकस व ताजा आहार द्यावा, मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावे, विद्युत बिल भरण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अंगणवाडी कर्मचाºयांना नक्षलभत्ता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी (आयटक)च्या कर्मचºयांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. याा आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संघटक देवराव चवळे यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, एम. एन. उईके, एन. एम. टेंभुर्णे यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका संघगडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये एकूण ९३४ प्रेरक व प्रेरिका कार्यरत आहेत. निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याचे महत्त्वाचे काम प्रेरक करीत आहेत. या प्रेरकांना ३५ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. थकीत मानधन देण्यात यावे, यासाठी यापूर्वी प्रेरकांनी १८ आॅक्टोबर २०१६ रोजी आझाद मैदान मुंबई व १८ एप्रिल २०१७ रोजी शिक्षण संचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र तरीही अजुनपर्यंत थकीत मानधन दिले नाही. थकीत मानधन द्यावे, मानधनात वाढ करून दरमहा १० हजार रूपये मानधन द्यावे, बीएलओ, आर्थिक गणनेचा सर्वे, जनगणनेची कामे, शाळाबाह्य कामे देण्यात येऊ नये, प्रेरकांसाठी शासकीय सेवेत जागा आरक्षित कराव्या आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटक संतोष केंदळे, जिल्हाध्यक्ष मिथून बांबोळे, उपाध्यक्ष रूपेश किसने, जिल्हा सचिव कैलाश बगमारे, जिल्हा कोषाध्यक्ष लिना सरकार, सुरेश सहारे, अमिन पठाण, शरद हलामी यांनी केले. जिल्हाभरातील प्रेरक सहभागी झाले होते. अधिकाºयांना निवेदन देऊन थकीत मानधन देण्याविषयी चर्चा केली.शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकशेतकºयांना तत्काळ कर्जमुक्ती द्यावी, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ तत्काळ द्यावा यासाठी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी १ वाजता धडक दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना देण्यात आले. त्याचबरोबर जिल्हाधिकाºयांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती जाणून घेतली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी संपर्कप्रमुख रमेश तिवारी, जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, महिला जिल्हा प्रमुख छाया कुंभारे यांनी केले.आंदोलनात उपजिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, राजू कावळे, राजगोपाल सुल्लावार, अविनाश गेडाम, युवासेना प्रमुख चंदू बेहरे, तालुका प्रमुख घनश्याम कोलते, शहर प्रमुख रामकिरीत यादव, ज्ञानेश्वर बगमारे, किशोर रामगिरवार, छाया रामगिरवार, सुनंदा आतला, बिरजू गेडाम, सुशिला रच्चावार, विलास ठोंबरे, संदीप दुधबळे, गजानन नैताम, अमित यासलवार, नुतन कुंभारे, मंजुळा पदा, दिवाकर भोयर, अमित क्षिरसागर, मंजुषा रॉय, महेंद्र मेश्राम, त्र्येंबक खरकाटे, भुषण सातव, नंदू चावला, विठ्ठल ढोरे, अविनाश शिलमवारर, निलकमल मंडल, बिरजू गेडाम, मनोज गेडाम, दीपक संगमवार, रूपेश सलामे, अरूण आत्राम, राकेश भोयर, विजय ब्राह्मणवाडे, अजय ठेमस्कर उपस्थित होते.