लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महिला वन कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या भगवान सखाराम आत्राम (४८) या वन परिक्षेत्राधिकाऱ्यास धानोरा न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास व २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.भगवान आत्राम हा धानोरा तालुक्यात वन परिक्षेत्राधिकारी म्हणून कार्यरत असताना दोन वर्षांपूर्वी त्याने महिला वनकर्मचाºयाला स्वत:च्या दुचाकीवर बसवून जंगलात नेले. जंगलात नेल्यानंतर लैंगिक सुखाची मागणी केली. महिला वन कर्मचाºयाने विरोध केला असता, तिचे दोन्ही हात पकडून गालाची पप्पी घेतली. सदर घटना कुणाला सांगितल्यास निलंबित करण्याची धमकी दिली. मात्र सदर महिला कर्मचाऱ्याने याबाबतची तक्रार मुरूमगाव पोलीस मदत केंद्रात दाखल केली. पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील भांबरे यांनी गुन्ह्याचा तपास करून आत्राम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण धानोरा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा निकाल २० जुलै रोजी लागला आहे. यामध्ये न्यायाधीश एन. पी. वासाडे यांनी आरोपीला तीन वर्षांच्या कारागृहाची शिक्षा व २० हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. पी. पी. हटकर यांनी काम पाहिले.
विनयभंग करणाऱ्या आरएफओस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:17 IST
महिला वन कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या भगवान सखाराम आत्राम (४८) या वन परिक्षेत्राधिकाऱ्यास धानोरा न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास व २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
विनयभंग करणाऱ्या आरएफओस कारावास
ठळक मुद्देमुरूमगावातील घटना : धानोरा न्यायालयाचा निकाल