लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-चपराळा मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे जत्रा भरण्यापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इल्लूर, ठाकरी, कुनघाडा या तीन गावातील सरपंचांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी कुनघाडा (माल) च्या सरपंच कीर्ती पेंदाम, उपसरपंच मधुकर पुण्यलवार, ठाकरीच्या सरपंच नंदा कुळसंगे, उपसरपंच मधुकर दुमनवार, इल्लुरच्या सरपंच निरंजना मडावी, उपसरपंच रामचंद्र बामनकर आदी उपस्थित होते. आष्टी-कुनघाडा या १२ किमीच्या रस्त्यावर डांबरीकरण झालेले आहे. मात्र पेपरमिलमध्ये येणाऱ्या जड वाहनामुळे व चपराळा येथे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे हा रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. १३ फेब्रुवारीपासून चपराळा येथे यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहणार आहे. त्यामुळे जत्रेपूर्वी या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी पत्रपरिषदेतून करण्यात आली. डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रा.पं. पदाधिकाºयांनी दिला आहे.
डांबरीकरण करा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:43 IST
आष्टी-चपराळा मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे जत्रा भरण्यापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल,
डांबरीकरण करा अन्यथा आंदोलन
ठळक मुद्देतीन गावातील सरपंचांचा इशारा : चपराळापर्यंत डांबरीकरण करा