शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यासाठी मोबाईल व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:30 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगावातच सुविधा : आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणी उभे करणार वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.विजेसह सर्व साहित्य व उपकरणे महावितरणला नगदी खरेदी करावी लागतात. त्यामुळे १०० टक्के वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. वीज बिलाच्या वसुलीचे प्रमाण वाढावे, यासाठी महावितरणने आजपर्यंत अनेक उपाय केले आहेत. ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडे मात्र स्मार्ट फोन राहत नाही. त्याचबरोबर मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने वीज बिल भरणे शक्य होत नाही. ग्रामीण भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वीज बिलाचा भरणा बँकेत करावा लागतो. १० ते १२ किमी अंतरावर असलेल्या बँकेत जाऊन वीज बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे काही नागरिक पैसे असूनही वीज बिल भरत नाही. गावातच वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोबाईल व्हॅन सेवा सुरू केली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील घोट शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड उपविभागातील पहार्णी, राजुरा उपविभागातील देवाडा, वरोरा तसेच चंद्रपूर उपविभागातही ही सेवा सुरू केली जाणार आहे. आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर मोबाईल व्हॅन नेली जाणार आहे. ज्या गावातील वीज बिलाची वसुली कमी आहे, अशा गावांना विशेष प्राधान्य देऊन त्या गावामध्ये व्हॅन जाईल. प्रयोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या सुविधेचा आढावा तीन महिन्यानंतर घेतला जाणार आहे. नागरिकांकडून मिळणाºया प्रतिसादानंतर त्याठिकाणी ही सुविधा पुढे सुरू ठेवायची की नाही किंवा या सुविधेची व्याप्ती वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.वाहनात राहतील या सुविधावीज बिल भरणा केंद्रात संगणक, इंटरनेट आदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. वीज बिलाचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकाला पावती उपलब्ध करून दिली जाणार आहे. वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुर्गम भागातील गावे, दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेली गावे तसेच ज्या गावातील वीज बिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावांमध्ये सदर वाहन नेले जाईल.

टॅग्स :electricityवीज